उत्तर पश्चिम (वायव्य) येथील महायुतीची उमेदवारी रवींद्र वायकर यांना !

उत्तर-पश्चिम (वायव्य) येथून लोकसभेसाठी महायुतीची उमेदवारी रवींद्र वायकर यांना देण्यात आली आहे. शिवसेनेच्या ‘एक्स’ खात्यावर वायकर यांना उमेदवारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संचलन

लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे या दिवशी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीसदलाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी संचलन करण्यात आले. 

चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात २९८ उमेदवार रिंगणात !

लोकसभेच्या निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्याचे मतदान १३ मे या दिवशी  ११ मतदारसंघात होणार आहे. या सर्व मतदारसंघांत मिळून एकूण २९८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Narendra Modi In Pune : मोदी आतंकवाद्यांना घरात घुसून मारणार !

मुंबई आणि पुणे येथे रक्तस्त्राव झाला होता; पण हा मोदी, घरात घुसून मारणार, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केले आहे.

मुंबईत मतदान केंद्रांवर आरोग्य, तसेच थंड पाण्याची सुविधा

मुंबई महानगरपालिकेने निवडणूक केंद्रांवर आरोग्य सेवा पुरवण्यासाठी ‘आपला दवाखाना’, तसेच आरोग्य केंद्र आणि चिकित्सालये येथील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

नगरमधून ‘एम्.आय.एम्.’ची उमेदवारी रहित !

एम्.आय.एम्.’चा उमेदवार असल्यास भाजपचा लाभ होतो, म्हणून मुसलमान समाजातूनच या उमेदवारीला विरोध झाल्याचे सांगण्यात येते. अशरफी सध्या भ्रमणभाष उचलत नाहीत, असे समजते.

सांगली येथील महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांना प्रशासनाकडून नोटीस !

खर्च नियंत्रण कक्षात सादर केल्यानुसार ९ लाख २ सहस्र ५०८ रुपये खर्च झाल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्ष नोंदवहीतील नोंदीनुसार हा खर्च ६ लाख ९४ सहस्र ९३३ रुपये आहे. या दोन्हीतील फरक २ लाख ७ सहस्र ५७५ रुपये आहे.

नाशिक येथे शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेकडून निवडणुकीचा अर्ज भरला !

‘भक्तपरिवार आणि जनता जनार्दन यांच्या वतीने मी निवडणूक लढवतोय’, असे शांतीगिरी महाराज म्हणाले. शिवसेनेनं ‘एबी फॉर्म’ दिलेला नसतांनाही तुम्ही त्यांच्याकडून अर्ज कसा भरला ?

पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर येरवडा (पुणे) भागातून अब्दुलाह रुमी याला अटक !

लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! धर्मांधाला बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणार्‍या संबंधितांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप

पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांचे ‘अबकी बार ४०० पार’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात मतदान होणे आवश्यक आहे, असे आवाहन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले