नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार हे ‘मी जातीयवादी नाही’, असे सांगतात; पण ते काय आहेत, हे लोकांना ठाऊक आहे. मला त्यावर बोलायचे नाही. त्यांनी ज्या मौलाना नोमानींचा पाठिंबा घेतला आहे, त्यांच्या १७ मागण्या मान्य केल्या, त्या नोमानींनी सांगितले की, ‘व्होट जिहाद’ होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
ते म्हणाले की,…
आमदार नितेश राणे हे नव्या रक्ताचे हिंदुत्वनिष्ठ आक्रमक नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. विधानसभेतील त्यांची भाषणे अभ्यासपूर्वक आहेत. संपूर्ण राज्यात हिंदु जागरणाचे त्यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कणकवली म्हणजे राणे कुटुंबियांचा बालेकिल्ला ! आमदार नितेश राणे हे कणकवली विधानसभेतून निवडून येणारच आहेत. कणकवली मतदारसंघातील सर्व मतदारांना माझे विनम्र आवाहन आहे की, संघटित शक्तीसाठी राणे विधानसभेत असलेच पाहिजेत. मोठ्या मताधिक्याने नितेश राणे यांना निवडून द्या.