दत्तपिठाचे फलक काढले, तर आंदोलन करू ! – प्रमोद मुतालिक यांची चेतावणी
दत्तपिठाची समिती आणि त्याचे फलक पालटले पाहिजेत, अशी मुसलमानांची समुदायाची मागणी असल्याचे ऐकिवात आहे. कर्नाटक सरकारने याचा स्वीकार केल्यास राज्यात तीव्र आंदोलन करू, अशी चेतावणी दत्तामाला अभियानाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी दिली.