गोव्यातील बागा समुद्रकिनार्‍यावरील ‘कॅफे अरूबा क्लब’ला टाळे

लैंगिक व्यवहाराविषयीचे आमीष दाखवून गुजरातमधील पर्यटकाकडून ४४ सहस्र रुपये लुटल्याच्या प्रकरणी बागा समुद्रकिनार्‍यावरील ‘कॅफे अरूबा क्लब’ला मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून संबंधित अधिकार्‍यांनी टाळे ठोकले आहे.

वैज्ञानिक निशांत अग्रवाल याला जन्मठेपेची शिक्षा !

निशांत हा फेसबुकवर पाकच्या महिला मित्रांसमवेत ‘डी.आर्.डी.ओ.’ची माहिती शेअर करत होता. ही माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. आणि अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेला पोचवली जात होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगाव (जिल्हा पुणे) येथे ३ दिवसांचा कीर्तन महोत्सव !

केडगाव येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच’च्या वतीने संत चोखामेळा यांची पुण्यतिथी, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त २८ ते ३० मे असे ३ दिवस कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कोल्हापूर शहरात भरधाव कारने चौघांना उडवले : ३ जण ठार; रविना टंडन यांच्या विरोधातील तक्रार खोटी ! – मुंबई पोलीस…

कोल्हापूर शहरात सायबर चौक येथे भीषण अपघात झाला आहे. यात भरधाव वेगाने जाणार्‍या चारचाकी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याच्या गाडीने चार दुचाकीस्वारांना उडवले.

कल्याणीनगर (पुणे) येथे नाकाबंदीच्या वेळी पोलीस अधिकार्‍याने पाय दाबून घेतल्याची चित्रफीत प्रसारित !

येरवडा पोलिसांकडून कल्याणीनगर चौकामध्ये नाकाबंदी करण्यात आली होती. या वेळी पडताळणीसाठी थांबवलेल्या एका युवकाकडून उपस्थित असणार्‍या पोलीस अधिकार्‍याने पाय दाबून घेतल्याची चित्रफीत प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाली आहे.

‘प्रिन्स शिवाजी’मध्ये अभियांत्रिकीचा पदवी अभ्यासक्रम चालू करण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून मान्यता !

नवीन अभ्यासक्रमात ‘मेकॅनिकल ॲन्ड मेकॅट्रॉनिक्स’, ‘इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड पॉवर’, ‘कम्प्युटर सायन्स’, ‘कम्प्युटर सायन्स (ए.आय.एम्.एल्.) हे उदयोन्मुख कल असलेले पदवी अभ्यासक्रम उपलब्ध असतील.

‘स्वातंत्र्यवीर’ उपाधी चेष्टेची नाही, तर सन्मानाची गोष्ट आहे ! – सुभाष राठी, जिल्हाध्यक्ष, विश्व हिंदु परिषद

आजपर्यंत संपूर्ण जगात कुणालाही न मिळालेली ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी वि.दा. सावरकर यांना भारतीय समाजाकडून दिली गेली. ती आम्हा भारतियांसाठी सन्मानाची आणि अभिमानाची घटना होय.

आतंकवादाला प्रोत्साहन देणार्‍या झाकीर नाईकला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करा !

संयुक्त राष्ट्र संघात झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासाठी, तसेच त्याला भारताच्या कह्यात देण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सगेसोयर्‍यांच्या सूत्राची कार्यवाही न केल्यास निवडणुकीला सर्वच जागांवर उमेदवार उभे करणार ! – मनोज जरांगे पाटील

सरकारने सगेसोयर्‍यांच्या सूत्राची कार्यवाही करून सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले नाही, तर आपण विधानसभा निवडणुकीला सर्वच २८८ जागांवर उमेदवार उभे करणार, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्त ‘कोल्हापूर हायकर्स’ची ‘पवित्र जल संकलन’ मोहीम ! – सागर पाटील

सह्याद्री पर्वतरांगा आणि हिमालयातून ट्रेकिंग करून प्रत्येक वर्षी ‘कोल्हापूर हायकर्स’चे मावळे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हे जल आणतात. विविध ठिकाणांहून आणलेले हे पवित्र जल एकत्रित करून ५ जूनला रायगडावर पोचवणार आहोत.