औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे करण्यासाठी मनसेकडून २६ जानेवारीपर्यंत समयमर्यादा 

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यासाठी नामांतराचा अध्यादेश २६ जानेवारीपर्यंत काढण्याची समयमर्यादा (अल्टिमेटम) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १९ जानेवारी या दिवशी विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात आली.

कर्नाटक सरकारने घातलेली गोहत्याबंदी कर्नाटक उच्च न्यायालयाकडून वैध घोषित

गोहत्याबंदीला विरोध करणारी काँग्रेस आणि पुरो(अधो)गामी यांना चपराक !

कुतुब मीनार कुतुबुद्दीन ऐबक याने बांधल्याचे पुस्तकातून शिकवणार्‍या एन्.सी.ई.आर्.टी.कडे त्याविषयी पुरावे नाहीत !

कुतुब मीनार ही वास्तू हिंदूंची असून याचे नाव ‘विष्णुस्तंभ’ आहे, हे विविध इतिहासकारांनी पुराव्यानिशी समोर आणले आहे. सर्वोच्च न्यायालयातही याचिका प्रविष्ट करण्यात आल्याने आता केंद्र सरकारने योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे मंदिरातील पुजार्‍याची हत्या करून लूटमार !

उत्तरप्रदेशात गेल्या काही मासांत साधू, संत आणि पुजारी यांंच्या झालेल्या हत्या पहाता येथील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, हेच लक्षात येते ! राज्यात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !  

‘तांडव’च्या विरोधात कारवाई केली जाईल ! – अनिल देशमुख, गृहमंत्री, महाराष्ट्र

देवतांचे विडंबन असलेल्या ‘तांडव’ या वेब सिरीजविषयी तक्रार आली असून करवाई होईल; पण ‘ओटीटी’वर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे केंद्र सरकारने याविषयी कायदा आणावा, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

(म्हणे) ‘उत्तरप्रदेश विधान परिषदेच्या दालनातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र हटवा !’ – काँग्रेसचे आमदार दीपक सिंह यांची मागणी

शिळ्या कढीला उकळी देण्याचा काँग्रेसचा नेहमीचा प्रयत्न ! काँग्रेसवाल्यांना सावरकर आजन्मात कळणार नाहीत आणि ते अशा प्रकारची हास्यास्पद मागणी करत रहातील !

काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणारे ३ आतंकवादी ठार, तर ४ सैनिक घायाळ

पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणे अशक्य !

गुजरात सरकारकडून ‘ड्रॅगन फ्रूट’ फळाचे ‘कमलम्’ असे नामांतर !

गुजरातमधील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! आता केंद्र सरकारनेही याविषयीचे निर्णय घ्यावेत !

वैजापूर (जिल्हा संभाजीनगर) येथे एस्.टी. बसवर ‘संभाजीनगर’ असा फलक लावल्याच्या कारणावरून एम्.आय.एम्.कडून दगडफेक !

औरंगाबादवर एम्.आय.एम्.च्या धर्मांधांचे प्रेम आणि संभाजीनगर नामांतराला किती टोकाचा विरोध आहे, हे एस्.टी. बसवर केलेल्या दगडफेकीवरून दिसून येते.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करा !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी घालून दोषींवर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने २० जानेवारीला येथील जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.