संभाजीनगर – औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यासाठी नामांतराचा अध्यादेश २६ जानेवारीपर्यंत काढण्याची समयमर्यादा (अल्टिमेटम) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १९ जानेवारी या दिवशी विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात आली. या वेळी जिल्हाप्रमुख सुहास दशरथे, संदीप कुलकर्णी, नूतन जैस्वाल यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मागील ३२ वर्षांपासून नामांतराचा विषय रेंगाळत आहे. महानगरपालिकेत नामकरणाचा ठरावही संमत झालेला आहे, तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्ष २०१९ मध्ये संभाजीनगर नामकरण करण्यासाठी शासनाला आवाहन केले होते.