पुणे – शहरात गुटख्याची वाहतूक आणि विक्री अवैधपणे चालू असल्याचे अनेक घटनांमधून उघड झाले आहे. पोलिसांनी चित्रकलाचार्य नारायणराव पूरम चौकात गुटख्याची वाहतूक करणारा टेंपो पकडला. टेंपोमध्ये सुगंधि तंबाखू, रजनीगंधा, विमल असा १५ लाख ६५ सहस्र रुपयांचा साठा पोलिसांना मिळाला. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून चालकाला कह्यात घेतले आहे. (गुटखा बंदी असतांना उत्पादने सिद्ध होणे ही कायदा सुव्यवस्थेची ऐशी-तैशीच ! – संपादक) कुदबुद्दीन दारूवाला असे कह्यात घेतलेल्या टेंपोचालकाचे नाव आहे. खडक वाहतूक विभागातील पोलीस कर्मचार्यांनी या प्रकरणाची तक्रार नोंदवली. बाजीराव रस्ता आणि टिळक रस्ता यांना जोडणार्या पूरम चौकामध्ये ही कारवाई करण्यात आली.