कथित प्रक्षोभक चिथावणी देण्याविषयी कोणताही पुरावा नसल्याने राज ठाकरे यांची निर्दाेष मुक्तता !

२१ ऑक्टोबर २००८ या दिवशी धाराशिव जिल्ह्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एस्.टी. बसगाड्यांवर दगडफेक केल्याचा आरोप केला होता.

महायुतीला पाठिंबा द्या ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा द्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा !; संजय निरूपम शिवसेनेत जाण्याची शक्यता !…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा ‘टीझर’ (विज्ञापन) प्रसारित करण्यात आला आहे. ९ एप्रिलला शिवतीर्थावर येण्याचे आमंत्रण यात देण्यात आले आहे.

वसंत मोरे यांचा मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा !

माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून वागणुकीवर आक्षेप घेतले जात होते. अशा ठिकाणी न राहिलेलेच बरे, असे वसंत मोरे यांनी १२ मार्चला मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.

राज्य माझ्या हातात दिल्यास एकत्र मशिदींवरील भोंगे बंद करू ! – राज ठाकरे

येथे ९ मार्च या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापनदिन सोहळा पार पडला.

छत्रपतींचे नाव घेतल्याने मुसलमानांची मते मिळणार नाहीत, असे पवारांना वाटायचे !

मी एका मुलाखतीत शरद पवार यांना ‘तुम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेता; पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही’ असे म्हटले होते. त्यावर त्यांनी मौन साधले होते.

जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वाघोली येथील शाळेच्या कार्यालयात मनसेची तोडफोड !

अशी वेळ का येते ? याचा विचार शाळा प्रशासन करणार का ?

माजी नगरसेविका स्मिता आष्टेकर आणि मनसेच्या अधिवक्त्या अनिता दिघे यांचे सुषमा अंधारे यांच्यावर आरोप !

सुषमा अंधारे यांनी स्वत:च्या जुन्या भाषणात हिंदु देवतांविषयी अपशब्द वापरल्याने मी त्यांचा निषेध केला असून त्यांनी पुन्हा नगरमध्ये येऊन दाखवावे, त्यांना मी माझा हिसका दाखवल्याविना रहाणार नाही, अशी चेतावणी शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्षा, माजी नगरसेविका स्मिता आष्टेकर यांनी दिली आहे.

मनसेने पोलिसांना समवेत घेऊन केली कारवाई !

निवासासाठी असलेल्या वसाहतीमध्ये बेकायदेशीर मदरसा चालू होईपर्यंत प्रशासन आणि पोलीस झोपा काढत होते का ? मनसेने या प्रकरणात लक्ष वेधले नसते, तर हा बेकायदेशीर मदरसा असाच चालू राहिला असता !

छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनी पेपर ठेवल्याने मनसे आक्रमक !

शासकीय सुटीच्या दिवशी सर्वांना सुटी असतांना शाळाही बंद असतात. अशा दिवशी पेपर ठेवणार्‍या सी.बी.एस्.ई. बोर्डाला वठणीवर आणण्यासाठी मनसेसारखेच पक्ष हवेत !