हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करा !

हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने कोल्हापूर येथे निवेदन

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भाऊसाहेब गलांडे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, २० जानेवारी (वार्ता.) – ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’वर चित्रपट अभिनेते सैफ अली खान, डिंपल कपाडिया, मोहम्मद जीशान अय्यूब, गौहर खान यांची भूमिका असलेली, तसेच अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘तांडव’ ही वेब सिरीज प्रसारित झाली. त्यात शिव आणि श्रीराम यांचा अवमान करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे व्यक्तीरेखा दाखवून त्यांचाही अपमान केला. वेब सिरीजवर बंदी घालून दोषींवर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने २० जानेवारीला येथील जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भाऊसाहेब गलांडे यांनी स्वीकारले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भाऊसाहेब गलांडे (उजवीकडे) यांच्याशी चर्चा करतांना हिंदुत्वनिष्ठ

या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. अशोक रामचंदानी, शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री. शशी बीडकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्री. किशोर घाटगे, युवासेना तालुकाप्रमुख श्री. संतोष चौगुले, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे, शिवसेना कामगारसेना जिल्हाध्यक्ष श्री. राजू सांगावकर, समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.