नवी देहली – देहलीत वर्ष २०२२ मध्ये झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला तिहार कारागृहात अटकेत आहे. त्याला लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून लक्ष्य करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येतील आरोपी शिवकुमार गौतम याने चौकशीत ही माहिती दिली. यानंतर तिहार कारागृह प्रशासन आफताब पूनावालाच्या सुरक्षेविषयी सतर्क झाले आहे.
आफताब पूनावाला आणि श्रद्धा अनेक दिवसांपासून देहलीत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये रहात होते. मुंबई पोलिसांच्या माहितीवरून देहली पोलिसांनी आफताबला घरातून अटक केली होती. अन्वेषणाच्या वेळी आफताबने श्रद्धाची हत्या करून तिचे तुकडे केल्याची स्वीकृती दिली होती.