नसरापूर प्रकरणातील नराधामाला हाल हाल करून संपवा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
नसरापूर येथील ४ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, ‘‘नसरापूर येथील घटनेने मला भयानक चीड आली असून नराधामाला हाल हाल करून संपवा. सरकारने आरोपींना कठोर आणि तात्काळ शिक्षा दिली पाहिजे.