इस्रायलच्या सीरियावरील आक्रमणात १५ जण ठार

‘इस्लामिक जिहाद’ या संघटनेच्या तळांना केले लक्ष्य !

इस्रायलचे सीरियावर आक्रमण

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कस आणि त्याच्या शेजारील भागांवर केलेल्या आक्रमणामध्ये १५ जण ठार, तर १६ जण घायाळ झाले. हे आक्रमण ‘इस्लामिक जिहाद’ या संघटनेच्या स्थानांना लक्ष्य करण्यासाठी केल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे.

७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणात ही संघटनाही सहभागी होती, असे इस्रायलच्या सैन्याने म्हटले आहे.