कर्नाटक सरकारने घातलेली गोहत्याबंदी कर्नाटक उच्च न्यायालयाकडून वैध घोषित

गोहत्याबंदीला विरोध करणारी काँग्रेस आणि पुरो(अधो)गामी यांना चपराक !

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक उच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारने घातलेली गोहत्येवरील बंदी वैध ठरवली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सरकारकडून बंदीची कार्यवाही करवून घेण्यासाठी निर्माण झालेला अडथळा दूर झाला आहे.

सरकारच्या गोहत्याबंदी कायद्यानुसार गोहत्या करणार्‍याला ५० सहस्र ते १ लाख रुपयांचा दंड, ३ ते ७ वर्षांचा कारावास आदी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.