‘केळवकर मेडिकल सेंटर’ येथे १७ नोव्हेंबरला मधुमेहींसाठी विशेष मेळावा !

‘केळवकर मेडिकल सेंटर’ येथे १७ नोव्हेंबरला मधुमेहींसाठी होणार्‍या मेळाव्याची निमंत्रण पत्रिका

कोल्हापूर, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – जागतिक मधुमेहदिनाच्या निमित्ताने केळवकर मेडिकल सेंटर (ई वॉर्ड, ताराबाई पार्क) येथे १७ नोव्हेंबरला सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० या वेळेत मधुमेहींसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सहभागी झालेल्यांना रक्तातील साखर, थायरॉईड पडताळणी, डोळ्यांची पडताळणी विनामूल्य करून मिळणार आहे. या मेळाव्यात तज्ञ डॉक्टरांकडून मधुमेह व्यवस्थापन, जीवनशैलीत सुधारणा, व्यायाम, औषधोपचार आणि अन्य मार्गदर्शन मिळणार आहे, अशी माहिती डॉ. विक्रमसिंह अर्दाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी डॉ. प्रल्हाद केळवकर, डॉ. मंगेश पानसरे, डॉ. विनया पाटील, आहारतज्ञ प्रीती माखीजानी, समृद्धी काकडे उपस्थित होत्या.

डॉ. प्रल्हाद केळवकर म्हणाले, ‘‘या वर्षीच्या जागतिक मधुमेहदिनाचे वाक्य ‘मधुमेह आणि कल्याण’ असे आहे. त्यामुळे आम्ही मधुमेह व्यवस्थापन आणि त्या संबंधित आरोग्याविषयी जागरूकता वाढवू इच्छितो. या मेळाव्यात नागरिकांना त्यांच्या आरोग्याची पडताळणी करून घेता येईल आणि तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. तरी अधिकाधिक गरजूंनी याचा लाभ घ्यावा.’’