पुणे – शरद पवारांच्या बारामतीत एकदा जाऊन या म्हणजे कळेल किती उद्योगधंदे त्यांनी त्या ठिकाणी आणले ? पवारसाहेब, तुम्ही बारामतीमध्ये उद्योगधंदे आणले, मग महाराष्ट्रात का आणू शकला नाहीत ? आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचा नेता का म्हणायचे ? जो महाराष्ट्रात उद्योगधंदे आणेल, रोजगार देईल, बेरोजगार तरुणांना काम देईल, तो महाराष्ट्राचा नेता. स्वत:च्या तालुक्याचा विकास करायचा म्हणजे तो तालुक्याचा नेता. जाणता राजा वगैरे नंतरची गोष्ट असल्याचे म्हणत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. खडकवासला मतदारसंघात मनसेचे उमेदवार मयूरेश रमेश वांजळे यांच्या प्रचारार्थ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली, त्या वेळी ते बोलत होते.