काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणारे ३ आतंकवादी ठार, तर ४ सैनिक घायाळ

पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणे अशक्य !

प्रतिकात्मक चित्र

अखनूर (जम्मू-काश्मीर) – येथील नियंत्रणरेषेवरून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या ३ आतंकवाद्यांना भारतीय सैन्याने ठार केले; मात्र या वेळी झालेल्या चकमकीत ४ सैनिक घायाळ झाले.

आतंकवाद्यांना घुसखोरी करता यावी; म्हणून भारतीय सैन्याचे लक्ष विचलीत करण्यासाठी पाक सैन्याकडून भारतीय सैनिकी चौक्यांवर गोळीबार करण्यात येत होता.