धार (मध्यप्रदेश) येथे एस्.टी. महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

अपघाताच्या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी एस्.टी. महामंडळाने ०२२-२३०२३९४० हा ‘हेल्पलाईन’ क्रमांक चालू केला आहे.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे ‘श्री गुरुपौर्णिमा महोत्सव’ आणि ‘प.पू. अच्युतानंद महाराज शतकोत्तर जन्मोत्सव’ भावपूर्णरित्या साजरा !

११ जुलै या दिवशी ‘प.पू. अच्युतानंद महाराज शतकोत्तर जन्मोत्सवा’च्या अंतर्गत सकाळी प.पू. अच्युतानंद महाराज (प.पू. भाऊ बिडवई) यांचे नामदेव पायरीचे भजन झाले. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत प.पू. अच्युतानंद महाराज रचित हिंदी आणि मराठी भजनांचा कार्यक्रम झाला.

‘मटर पनीर’ऐवजी ‘चिकन करी’चे पार्सल पाठवल्याने हॉटेलला द्यावी लागणार २० सहस्र रुपये हानीभरपाई !

एका हिंदु शाकाहारी कुटुंबाने ‘जीवाजी क्लब’ नावाच्या हॉटेलमधून शाकाहारी पदार्थ मागवला असतांना त्यांना ‘झोमॅटो’ या घरपोच अन्न पोचवणार्‍या आस्थापनाकडून मांसाहारी जेवण मिळाले. हे पाहून त्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला, तसेच त्यांना अन्नग्रहण करता आले नाही.

आदि शंकराचार्य यांच्या पुतळ्याच्या बांधकामाला मध्यप्रदेश उच्च न्यायालयाकडून स्थगिती

मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्‍वर येथे ५४ फूट उंच व्यासपिठावर उभारण्यात येणार्‍या आदि शंकराचार्य यांच्या १०८ फूट उंच पुतळ्याच्या बांधकामाला मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे ‘श्री गुरुपौर्णिमा महोत्सव’ आणि ‘प.पू. अच्युतानंद महाराज शतकोत्तर जन्मोत्सव’ यांचे आयोजन

‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक आणि पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदूर’ यांच्या वतीने ११ ते १३ जुलै या कालावधीत ‘श्री गुरुपौर्णिमा महोत्सव’ आणि ‘प.पू. अच्युतानंद महाराज शतकोत्तर जन्मोत्सव’ यांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून ७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ सहस्र रुपयांचा दंड !

मध्यप्रदेशातील एका महाविद्यालयाच्या वसतीगृहात हनुमान चालिसाचे सामूहिक पठण
जर येथे सामूहिक नमाजपठण करण्यात आले असते, तर महाविद्यालय प्रशासनाने अशीच कारवाई केली असती का ?

इंदूर (मध्यप्रदेश) येथील आश्रमात प.पू. भक्तराज महाराज यांचा जन्मोत्सव साजरा

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा ७ जुलै या दिवशी असलेला जन्मोत्सव येथील ‘भक्तवात्सल्याश्रमा’त भावपूर्णरित्या साजरा करण्यात आला.

‘गूगल मॅप’वर मंदिराच्या ठिकाणी मशीद दाखवणारे तिघे मुसलमान पोलिसांच्या कह्यात !

हिंदूंच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे आक्रमण करण्याचे आता कट्टरतावादी मुसलमानांना शिल्लक ठेवलेले नाही, हेच या घटनेतून लक्षात येते !

घटस्फोट मागणार्‍या पत्नीला रईस खान याने भररस्त्यात जाळले !

घटस्फोट मागणार्‍या पत्नीला रईस खान याने भररस्त्यात जाळून मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी पाणी टाकून तिला वाचवले.

गुना (मध्यप्रदेश) येथे भूमीच्या वादातून आदिवासी महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

या प्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली असून पसार असणार्‍या अन्य तिघांचा शोध घेण्यात येत आहे.