Muslims Threaten Ishvar : हिंदु धर्म स्वीकारलेल्या इम्रानला धर्मांध मुसलमानाकडून जिवे मारण्याची धमकी !

खंडवा (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील महादेवगड येथील इम्रान नावाच्या एका मुसलमान तरुणाने त्याच्या पत्नीसह नुकताच विधीवत् हिंदु धर्म स्वीकारला. इम्रानच्या धर्मांतराची माहिती मिळाल्यानंतर त्याचा मुसलमान घरमालक इफ्तिखार त्याच्या घरी आला आणि त्याला शिवीगाळ करू लागला. त्याने ईश्वर आणि त्याच्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी दिली. ईश्वरने इफ्तिखारच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. इफ्तिखार पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

१. हिंदु धर्म स्वीकारल्यानंतर इम्रानचे नाव पालटून ईश्वर ठेवण्यात आले होते. ईश्वर आणि त्याची पत्नी आनंदाने त्यांच्या भाड्याच्या घरात रहात होते.

२. ईश्वरने तक्रारीत म्हटले आहे की, इफ्तिखारने त्यांना चेतावणी दिली की, जर ते दोघेही २४ घंट्यांच्या आत इस्लाम धर्मात परतले नाहीत, तर तो त्यांना मारून टाकेल. या तक्रारीत त्याने म्हटले आहे की, इफ्तिखारने त्याच्या पत्नीशी गैरवर्तन केले.

३. ईश्वर आणि त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी इफ्तिखारच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. जव्हार पोलीस ठाण्याचे जी.पी. वर्मा म्हणाले की, आरोपी इफ्तिखारविरुद्ध विनयभंग, आक्रमण आणि जिवे मारण्याची धमकी या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांत तक्रार केल्याचे समजताच आरोपी इफ्तिखार पसार झाला आहे. ‘आरोपीला लवकरच अटक केली जाईल’, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

‘मी भोलेनाथचा पुत्र, घाबरणार नाही’!

ईश्वरने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे, ‘मी भोलेनाथचा पुत्र आहे आणि कुणाच्याही धमक्यांना घाबरत नाही. मी स्वेच्छेने सनातन धर्म स्वीकारला आहे. हा माझ्या श्रद्धेचा विषय आहे आणि मी या धर्मातच राहीन. कुणी मला जिवे मारण्याची धमकी दिली, तरी मी कुणालाही घाबरत नाही.’