इंदूर (मध्‍यप्रदेश) : ‘लव्‍ह जिहाद’ला विरोध केल्‍याने अमन शेखने हिंदु तरुणीवर केले चाकूने आक्रमण !

पोलिसांनी केली अटक

इंदूर (मध्‍यप्रदेश) – जिल्‍ह्यातील सनवेर शहरातील ही घटना असून अमन शेख नावाचा एक तरुण ‘एम्.बी.ए.’चे शिक्षण घेत असलेल्‍या २३ वर्षीय हिंदु विद्यार्थिनीच्‍या पाठीमागे होता. तब्‍बल ३ वर्षे तो तिला त्रास देत होता. तिने त्‍याला विरोध केल्‍याने त्‍याने तिच्‍यावर ३० जानेवारीच्‍या दुपारी चाकूद्वारे आक्रमण केले. यात ती गंभीर घायाळ झाली असून स्‍थानिक रुग्‍णालयात तिच्‍यावर उपचार चालू आहेत. तिच्‍या कुटुंबियांनी अमन शेखच्‍या विरुद्ध पोलिसात तक्रार प्रविष्‍ट (दाखल) केल्‍यानंतर पोलिसांनी त्‍याला अटक केली.

या प्रकरणाची माहिती देतांना पोलीस उपअधीक्षक उमाकांत चौधरी म्‍हणाले की…,

१. पीडित विद्यार्थिनी रस्‍त्‍याने चालत असतांना अमन शेखने तिला पकडून तिच्‍यावर चाकूने आक्रमण केले. गंभीर घायाळ झालेल्‍या पीडितेवर उपचार केल्‍यानंतर पीडितेची प्रकृती धोक्‍याबाहेर आहे.

२. आरोपी आणि विद्यार्थिनी दोघांनी एकाच महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

३. पीडितेने पोलिसांना सांगितले की, आरोपी वारंवार तिचा पाठलाग करत होता. अमन तिच्‍याशी बळजोरीनेे बोलण्‍याचा प्रयत्न करायचा.

४. या घटनेच्‍या निषेधार्थ सनवेरमधील हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी आंदोलन करून अर्धा दिवस स्‍थानिक बाजार बंद ठेवला होता.

५. आता परिस्‍थिती शांत आहे आणि विविध ठिकाणी पोलीस तैनात आहेत.