Pandit Dhirendrakrishna Shastri : महाकुंभाचा आध्यात्मिक लाभ करून घ्या !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

हिंदूंना जागृत करून हिंदुस्थानाला वाचवण्याचा संकल्प – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री, पीठाधीश्‍वर, बागेश्‍वरधाम

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

छत्तरपूर, मध्यप्रदेश –  महाकुंभ हा श्रद्धेचा विषय असून सनातन हिंदु संस्कृती समजणे आणि वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी ‘रिल’ (व्हिडिओज) बनवण्यापेक्षा महाकुंभक्षेत्राचा आध्यत्मिक लाभ करून घ्या, असे विधान बागेश्‍वरधामचे पीठाधीश्‍वर पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथे केले.

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री पुढे म्हणाले की,

१. ‘सनातन धर्म कसा वाचणार ?’, ‘हिंदुत्व कसे जागृत होणार ?’, ‘ हिंदु राष्ट्र कसे होईल ?’ आणि ‘ज्या हिंदूंना धोक्याने मुसलमान किंवा ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केले आहे अशा सर्वांचा हिंदु धर्मात पुर्नप्रवेश कसा करवून घ्यायचा ?’ या सर्व प्रश्‍नांवर महाकुंभक्षेत्रात चर्चा व्हायला हवी.

२. आम्ही निश्‍चय करून प्रयागराजला जाऊन एक कार्यक्रम करणार आहोत. ‘हिंदूंना जागृत करा, हिंदुस्थानाला वाचवा’, असा त्याचा संकल्प असेल.

३. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री २४ जानेवारी या दिवशी संगम स्नानासाठी महाकुंभक्षेत्री पोचतील.

४. लेटे हनुमान मंदिरासमोर दरबार लावून ३ दिवस कथा सांगून पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री ‘हिंदु वाचवा, हिंदुस्थान वाचवा’, हा संदेश देतील.