Basant Panchami In Bhojshala : वसंत पंचमीच्या दिवशी धारच्या (मध्यप्रदेश) भोजशाळेत करण्यात आली पूजा

सहस्रो हिंदूंची उपस्थिती

धार (मध्यप्रदेश) – येथे ३ फेब्रुवारी या दिवशी वसंत पंचमीनिमित्त भोजशाळेत हिंदूंनी पूजा आणि यज्ञ आयोजित केला. या कार्यक्रमात सुरक्षेसाठी प्रशासनाने ७०० हून अधिक पोलीस आणि नियोजनासाठी ४० अधिकारी तैनात केले होते. येथे ४ दिवसांचा वसंतोत्सव आयोजित केला जात आहे. याअंतर्गत मातृशक्ती संमेलन, भजन संध्या, कवी संमेलन आणि कन्या पूजन यांसारखे कार्यक्रम देखील आयोजित केले जात आहेत. ३ फेब्रुवारीला सहस्रो हिंदूंनी येथे पूजा केली.

मुसलमान भोजशाळेला कमाल मौला मशीद म्हणतो. या प्रकरणी हिंदु पक्षाने न्यायालयात खटला प्रविष्ट (दाखल) केला आहे. त्यावर न्यायालयाने येथे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्याचा आदेश दिल्यानंतर सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या खटल्यावर निर्णय येणे अद्याप बाकी आहे.