हिंदु धर्म स्वीकारलेल्या इम्रानला धर्मांध मुसलमानाकडून जिवे मारण्याची धमकी !

प्रतिकात्मक चित्र

खंडवा (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील महादेवगड येथील इम्रान नावाच्या मुसलमान तरुणाने त्याच्या पत्नीसह विधीवत् हिंदु धर्म स्वीकारला. इम्रानच्या धर्मांतराची माहिती मिळाल्यानंतर त्याचा मुसलमान घरमालक इफ्तिखार त्याच्या घरी आला आणि त्याला शिवीगाळ करू लागला. त्याने ईश्वर आणि त्याच्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी दिली. ईश्वरने इफ्तिखारच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. इफ्तिखार पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

‘मी भोलेनाथचा पुत्र, घाबरणार नाही’!

ईश्वरने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे, ‘मी भोलेनाथचा पुत्र आहे आणि कुणाच्याही धमक्यांना घाबरत नाही. मी स्वेच्छेने सनातन धर्म स्वीकारला आहे. हा माझ्या श्रद्धेचा विषय आहे आणि मी या धर्मातच राहीन. कुणी मला जिवे मारण्याची धमकी दिली, तरी मी कुणालाही घाबरत नाही.’