Mohanji Bhagwat On RSS Ghar Wapsi : संघाने घरवापसी राबवली नसती, तर आदिवासी देशद्रोही बनले असते  !

तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे विधान प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सार्वजनिक कार्यक्रमात केले उघड !

(‘घरवापसी’ म्हणजे धर्मांतरित हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणणे)

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत व तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

इंदूर (मध्यप्रदेश) – प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती असतांना संघाच्या ‘घर वापसी’ कार्यक्रमाचे कौतुक केले होते आणि ‘जर हा ‘घरवापसी’चा कार्यक्रम नसता, तर काही आदिवासी समुदाय देशद्रोही बनू शकले असते’ असे मुखर्जी म्हणाले होते, अशी माहिती प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे देवी अहिल्याबाई पुरस्कार वितरण समारंभात बोलतांना दिली.

प.पू. सरसंघचालक डॉ. भागवत पुढे म्हणाले की,

१. आपण जेव्हा पहिल्यांदाच प्रणव मुखर्जी यांना भेटण्यासाठी गेलो होतो, तेव्हा संसदेत ‘घर वापसी’वरून प्रचंड गदारोळ चालू होता. तेव्हा प्रणव मुखर्जी यांनी मला विचारले होते की, ‘धर्मांतर करणार्‍या आदिवासींचे काय होते ?’ यावर मी सांगितले की, ‘ते ख्रिस्ती बनतात.’ यावर मुखर्जी म्हणाले, ‘नाही, ते देशद्रोही बनतात. या घरवापसी कार्यक्रमामुळे ३० टक्के आदिवासी समुदाय आपल्या मूळ रूपात परतला, हे चांगले आहे’, असेही मुखर्जी म्हणाले होते.

२. जर धर्मांतर स्वयंप्रेरणेने झाले, तर त्यात काहीही वाईट नाही. आपला विश्‍वास आहे की, सर्व प्रकारच्या उपासना पद्धती योग्य आहेत आणि प्रत्येकाला त्याची उपासना पद्धत निवडण्याचा अधिकार असला हवा; मात्र जेव्हा धर्मांतर प्रलोभन देऊन अथवा बलपूर्वक केले जाते, तेव्हा त्याचा उद्देश आध्यात्मिक प्रगती नसून प्रभाव वाढवण्यासाठी लोकांना त्यांच्या मुळांपासून तोडणे, असा असतो.