Mallikarjun Kharge Controversial Statement : (म्हणे) ‘गंगा नदीत डुबकी मारून गरिबी संपणार नाही !’ – काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भाजपवर टीका

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

महू (मध्यप्रदेश) – गंगा नदीत डुबकी मारण्याची भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा चालू  आहे. गंगा नदीत डुबकी मारून जनतेची गरिबी दूर होणार नाही, असे विधान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी येथे ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ सभेत केले. ‘मला कुणाच्याही श्रद्धेला धक्का लावायचा नाही. जर कुणाची भावना दुखावली असेल, तर मी क्षमा मागतो’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

भाजपचे प्रवक्ते असणारे खासदार संबित पात्रा यांनी प्रत्युत्तर देतांना म्हटले की, मी खर्गे, राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा यांना आव्हान देतो की, ते इतर कोणत्याही धर्माच्या श्रद्धेबद्दल असे म्हणू शकतात का ? त्यांनी संपूर्ण देशाची क्षमा मागितली पाहिजे.

संपादकीय भूमिका

देशावर ५५ वर्षांहून अधिक काळ काँग्रेसची सत्ता होती आणि आजही काही राज्यांत काँग्रेसचे सरकार आहे. असे असतांना काँग्रेसने जनतेची गरिबी का दूर केली नाही, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे !