इंदूर (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठाने शहरातील ‘यशवंत निवास रोड’वरील एक मंदिर हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावण्याच्या त्याच्या आदेशाचा फेरआढावा घेण्यास नकार दिला. तसेच उच्च न्यायालयाने वादीला २५ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला. न्यायालयाने म्हटले की, पत्रकार असल्याचा दावा करणार्या वादीने त्यांच्या पुनर्विचार याचिकेत हे मंदिर हटवणे सार्वजनिक हिताचे का आहे, हे उघड केलेले नाही. ही याचिका प्रविष्ट करण्यामध्ये या याचिकाकर्त्याचा काही स्वार्थ आहे, असे दिसून येते.
१. न्यायमूर्ती विवेक रुशिया आणि न्यायमूर्ती गजेंद्र सिंह यांनी सांगितले की, याचिकाकर्ता ‘यशवंत निवास रोड’च्या परिसरातील रहिवासीही नाही. त्याने हे मंदिर का हटवायचे आहे, हे स्पष्ट केलेले नाही.
२. उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळून लावत वादीला दंडाचे २५ सहस्र रुपये कायदेशीर साहाय्यता सेवा प्राधिकरण, इंदूरच्या खात्यात जमा करण्याचा आदेश दिला.
संपादकीय भूमिका
|