Liquor Ban In MP 17 Cities : मध्यप्रदेशातील १७ धार्मिक शहरांमध्ये १ एप्रिलपासून दारूबंदी

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असणारी १७ शहरे अन् २ ग्रामीण भाग यांंमध्ये १ एप्रिलपासून संपूर्ण दारूबंदी लागू केली जाणार आहे. येथे दारूचे दुकान रहाणार नाही, दारूची निर्मितीही होणार नाही. तसेच येथे दारूही पिण्यास अनुमती दिली जाणार नाही. या ठिकाणी आधीच चालू असलेली दारूची सर्व दुकाने देखील बंद केली जातील.

दारूबंदी घालण्यात आलेली काही शहरे

उज्जैन, ओंकारेश्‍वर, महेश्‍वर, मंडलेश्‍वर, ओरछा, मैहर, चित्रकूट, दातिया, पन्ना, मंडला, मुलताई, मंदसौर आणि अमरकंटक

संपादकीय भूमिका

संपूर्ण देशात असणार्‍या सर्वच धार्मिक शहरांमध्ये दारूबंदी आणि मांसबंदी झाली पाहिजे !