कुटुंब नियोजनाचे निर्बंध लादण्यात आलेले नाहीत ! – केंद्र सरकार

देशात कुटुंब नियोजन करणे स्वेच्छिक आहे. त्यामुळे स्वतःचे कुटुंब किती मोठे असावे, याचा निर्णय दांपत्याकडून घेतला जातो. त्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादण्यात आलेले नाहीत, असे सरकारने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

हिंदु असल्याचे सांगून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांधाकडून तिच्याशी विवाह

‘युद्धामध्ये आणि प्रेमामध्ये सर्व क्षम्य असते’, असा प्रचार केला जातो; मात्र धर्मांधांकडून करण्यात येणारे कृत्य हे प्रेम नसून ‘लव्ह जिहाद’ असल्याने अशांना कठोर शिक्षाच झाली पाहिजे !

गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी ! – ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा

रामचंद्र गुहा हे साम्यवादी विचारसरणीचे इतिहासकार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी गांधी कुटुंबाविषयी केेलेल्या विधानाला नक्कीच महत्त्व आहे !

कृषी कायदे रहित करण्यासाठी शेतकर्‍यांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका

‘सध्या केंद्र सरकारने लागू केलेले कायदे हे शेतकर्‍यांच्या हिताचे नसून भांडवलदारांच्या हिताचे आहेत’, असे या याचिकेत म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे भूमीपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पांंतर्गत नवीन संसद भवन उभारण्यासाठी १० डिसेंबर या दिवशी भूमीपूजन सोहळा पार पडला. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उद्योगपती रतन टाटा आदी मान्यवर उपस्थित होते.

अमेरिकेतील ‘शीख फॉर जस्टिस’ या फुटीरतावादी संघटनेकडून भारतीय सैन्याातील शीख सैनिकांना बंडासाठी चिथावणी

‘शीख फॉर जस्टिस’ या संघटनेला पाकचे साहाय्य आहे. भारतातील सर्व प्रकारच्या आतंकवादी कारवाया कायमस्वरूपी रोखण्यासाठी पाकला नष्ट करणेच योग्य !

कुतुब मीनार परिसरातील मशीद ही २७ हिंदु आणि जैन मंदिरे पाडून बांधण्यात आल्याने ती हटवावी ! – देहली येथील न्यायालयात याचिका

जे सरकारने करायला हवे, त्यासाठी हिंदूंना न्यायालयात याचिका करून न्यायालयीन लढा द्यावा लागतो, हे अपेक्षित नाही !

बांगलादेशातील मशिदी आणि मदरसे यांमध्ये अल्लाच्या नावावर प्रतिदिन बलात्कार होतात ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरिन यांचा दावा

बांगलादेशात असे होते, असेल तर जगातील १५७ इस्लामी देशांमध्ये, तसेच भारतात जेथे अल्पसंख्य मोठ्या प्रमाणात आहेत, तेथे काय होत आहे, याचाही शोध घ्यायला हवा, असे कुणाला वाटल्यास त्याच आश्‍चर्य काय ?

केंद्र सरकारचा प्रस्ताव शेतकर्‍यांनी फेटाळला

१४ डिसेंबरला एकदिवसीय उपोषण आणि देशभरात धरणे आंदोलन करणार

देशभरातील शेतकर्‍यांचा बंद शांततेतच !

‘बंद’ म्हणजे स्वतःच्या मागण्यांसाठी देश आणि जनता यांना वेठीस धरून त्यांची सहस्रो कोटी रुपयांची हानी करणारा गुन्हाच होय ! अशा प्रकारे हानी करणे जनताद्रोहच होय ! सरकारनेही कुणावर अशा प्रकारचे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, याकडे लक्ष द्यायला पाहिजे !