अमेरिकेतील ‘शीख फॉर जस्टिस’ या फुटीरतावादी संघटनेकडून भारतीय सैन्याातील शीख सैनिकांना बंडासाठी चिथावणी

  • ‘शीख फॉर जस्टिस’ या संघटनेला पाकचे साहाय्य आहे. भारतातील सर्व प्रकारच्या आतंकवादी कारवाया कायमस्वरूपी रोखण्यासाठी पाकला नष्ट करणेच योग्य !
  • खलिस्तानप्रेमी संघटनांविषयी आणखी किती पुरावे मिळाल्यावर सरकारी यंत्रणा त्यांच्यावर कारवाई करणार आहे ?

नवी देहली – भारतीय सैन्यातील शीख सैनिकांना भारताच्या विरोधात बंड करण्यासाठी चिथावणी देण्याचा कट अमेरिकास्थित ‘शीख फॉर जस्टिस’ या फुटीरतावादी संघटनेने रचल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रात हे म्हटले आहे. काश्मिरी युवकांना कट्टरतावादाकडे नेणे आणि काश्मीरला भारतापासून वेगळे करणे याचे या संघटनेकडून समर्थन करण्यात येत आहे, असेही या आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपपत्रामध्ये १६ आरोपींची नाव आहेत. यात या संघटनेचा न्यूर्याक येथील नेता गुरपतवंतसिंह पन्नून, खलिस्तान टायगर फोर्सचा कॅनडा येथील प्रमुख हरदीपसिंह निज्जर आणि बब्बर खालसा इंटरनॅशनलचा इंग्लंड येथील प्रमुख परमजीत सिंह यांचा समावेश आहे.

एन्.आय.ए.ने म्हटले आहे की, यू.ए.पी.ए. अंतर्गत ‘शीख फॉर जस्टिस’वर बंदी असून ही संघटना खलिस्तानी आतंकवादी संघटनांचा तोंडवळा आहे. तिचा पाकिस्तानशी संबंध आहे. फेसबूक, ट्विटर, व्हॉट्स अ‍ॅप यांद्वारे ही संघटना स्वतंत्र खलिस्तानसाठी शांतता बिघडवणे आणि अस्थिरता वाढवण्याचे काम करते.