पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न !

राजस्थानमधील जयपूर येथील घटना

पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवड सायबर विभागाचे पोलीस आरोपीला पकडण्यासाठी जयपूर येथे गेले होते. त्या वेळी पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. (पोलीस आरोपीला पकडण्यात सतर्क का नसतात ? – संपादक) त्यात पिंपरी-चिंचवड सायबर विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी हे घायाळ झाले आहेत. या प्रकरणी जयपूर (राजस्थान) येथील स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.