ज्या शेतकर्‍यांचे पीककर्ज थकीत असेल, त्यांनाही खरीप हंगामासाठी नवीन पीककर्ज द्या ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

अधिकोषांनी येत्या खरीप हंगामात शेतकर्‍यांना पीक कर्जाचे वाटप करावे. ज्या शेतकर्‍यांचे आधीचे पीककर्ज थकीत असेल, त्यांनाही राज्यशासनाच्या ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’चा लाभ मिळणार आहे.

दळणवळण बंदी म्हणजे कृषीक्षेत्राला उभारी देण्याची संधी !

‘भारत हा ‘कृषीप्रधान देश’ म्हणून जगात ओळखला जातो. भारतातील ६५ टक्क्यांहून अधिक लोक शेती आणि शेतीशी निगडित व्यवसाय यांवर अवलंबून आहेत. ‘शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे’, असे म्हटले जाते.

टोळधाड परतवण्यासाठी ‘ड्रोन’द्वारे कीटकनाशक फवारणी ! – कृषीमंत्री दादा भुसे

टोळधाड ज्या भागांत येईल, त्या भागांत अग्नीशमन बंब आणि ‘ड्रोन’ यांद्वारे कीटकनाशक फवारणी करून हे संकट दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.

मध्यप्रदेशातून टोळधाडीचा महाराष्ट्रात प्रवेश !

जून आणि जुलै मासांत वाळवंटातून टोळधाड भारतात घुसते. यंदा मात्र दीड मास आधीच टोळधाडीने आक्रमण केले आहे. सध्या टोळ जिथे अंडी घालतात, त्या ठिकाणी फवारणी केली जात असली, तरी प्रादुर्भाव वाढल्यानंतर विमानातून किंवा ड्रोनने फवारणी करण्याचा पर्यायही वापरला जाऊ शकतो.

पश्‍चिम महाराष्ट्रात तापमान वाढीमुळे उन्हाळी पिके आणि फळबागा यांना मोठ्या प्रमाणात फटका

सोलापूर – उन्हाचा पारा वाढत असून गेल्या २ दिवसांपासून सोलापूर शहर आणि परिसर येथे ४५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हाळी पिके, भाजीपाला, फूलशेती यांना उन्हाचा फटका बसला आहे. प्रखर उन्हामुळे उभी पिके सुकू लागली असून फळबागांनाही हानी पोचत आहे.

व्यापार्‍यांच्या मागणीअभावी यवतमाळ जिल्ह्यातील केळी उत्पादकांची आर्थिक हानी

दळणवळण बंदी लागू झाल्यापासून केळीला व्यापार्‍यांकडून मागणी न मिळाल्याने लाखो रुपयांची केळी पडून आहेत. किरकोळ विक्रीला प्रतिसाद न मिळाल्याने हतबल झालेल्या वडगाव (जंगल) येथील गजानन पोटे या शेतकर्‍याने जनावरांना चारा म्हणून केळी घालणे चालू केले.

दुधाला हमीभाव द्यावा !

सध्या पशूखाद्यांचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग कात्रीत सापडला आहे. शेतकर्‍यांचा दुग्धोत्पादन व्यय आणि त्यातून मिळाणारा लाभ यांतील दरी न्यून झाली पाहिजे. यासाठी सरकारने वेळीच हस्तक्षेप करून पशूखाद्य आणि दूध यांचे भाव यांत समतोल साधला पाहिजे, अशी सामान्य शेतकर्‍यांची अपेक्षा आहे.