उपजिल्हाधिकार्यांच्या मुलाचा समावेश असल्याने प्राध्यापकांवर तक्रार मागे घेण्यास दबाव ! – काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर
पुणे – येथील वाडिया महाविद्यालयातील प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे. या प्रकरणी प्राध्यापकांनी तक्रार केली असता त्यांना नोकरीतून काढण्याची धमकी देण्यात आली. मुलीवर अत्याचार करणार्यांमध्ये उपजिल्हाधिकार्यांच्या मुलाचा सहभाग असल्याचा दावा राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे धंगेकर यांनी केली आहे. (असे असेल, तर पोलीस आणि महाविद्यालय प्रशासन त्यांची भूमिका स्पष्ट करून पीडितेला न्याय मिळवून देऊन दोषींवर कठोर कारवाई करणार का ? – संपादक)
वाडिया महाविद्यालयातील २ अल्पवयीन मुलींवर ५ जणांनी सामूहिक अत्याचार केला आहे, तसेच महाविद्यालयाच्या आवारामध्ये वेळोवेळी अत्याचार केला. त्याची चित्रफीत सिद्ध केली. ती सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित केली. या घटनेतील एक मुलगी त्याच महाविद्यालयातील प्राध्यापकांची आहे. त्यांनी महाविद्यालयाचे विश्वस्त सचिन सानप आणि अशोक चांडक यांच्यासह प्राचार्यांकडे तक्रार केली. तेव्हा प्राचार्यांनी त्यांना सक्तीच्या सुटीवर जाण्यास सांगून महाविद्यालयाची अपकीर्ती झाल्यास नोकरीतून काढून टाकण्याची धमकी दिली असल्याचे पत्रामध्ये नमूद केले आहे.
प्राध्यापकांनी तक्रार केली म्हणून त्यांच्या मुलीचा महाविद्यालयातील प्रवेशही रहित केला असल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे, तसेच अत्याचार करणार्यांमधील एक मुलगा हा उपजिल्हाधिकार्यांचा आहे. सानप यांचे या अधिकार्यांशी आर्थिक संबंध आहेत. त्या मुलाला वाचवण्यासाठी सानप हे पीडित मुलीच्या वडिलांवर (प्राध्यापकांवर) दबाव आणत असल्याचाही आरोप धंगेकर यांनी केला आहे.
संपादकीय भूमिका :छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मुलींवर सामूहिक अत्याचार होणे, हे पोलिसांसाठी लज्जास्पद ! |