गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला !

देशातील सर्वांत मोठे तेल आस्थापन असणार्‍या आय.ओ.सी.ने (इंडियन ऑईल कॉपरेशनने) दिलेल्या माहितीनुसार एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

ई-कॉमर्स आस्थापने देशात चिनी साहित्यांची विक्री करतात ! – ‘कॅट’चा आरोप

ई-कॉमर्स आस्थापनांच्या या व्यापारामुळे पंतप्रधान मोदी यांच्या ‘लोकल फॉर वोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या आवाहनाची खिल्ली उडवली जात आहे. त्यामुळेच या आस्थापनांवर सरकारचा कायदेशीर वचक असणे अतिशय आवश्यक !

देहली येथील शेतकरी आंदोलनामध्ये महिलांकडून ‘मोदी तू मर’ अशा प्रकारची घोषणाबाजी !

शेतकरी आणि त्याही महिलांकडून अशा प्रकारच्या घोषणा देण्यात येणे, हे भारतीय संस्कृतीला लज्जास्पद ! असे आंदोलन लोकशाहीला धरून आहे का ? सरकारने असे देशविघातक घटक शोधून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक !

युद्धासाठी भारत आता १० ऐवजी १५ दिवसांचा शस्त्रसाठा ठेवणार

भारतीय सुरक्षादलाला आता लढाईसाठी लागणारा १५ दिवसांचा शस्त्रसाठा करून ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे. पूर्वी केवळ १० दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा सिद्ध ठेवण्याची सुरक्षादलांना अनुमती होती.

हिंदु नाव धारण करून धर्मांध तरुणाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक शोषण

देहलीमधील कायदा आणि सुव्यवस्था केंद्राच्या अखत्यारीत आहे. देशाच्या राजधानीत ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे वाढत आहेत. हे लक्षात घेऊन आता केंद्र सरकारने येथेही लव्ह जिहादविरोधी कायदा अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

३ मास शिधावाटप केंद्रातून (रेशन दुकानातून) धान्य विकत न घेतल्यास शिधापत्रिका रहित होणार !

केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, एखादी व्यक्ती ३ मास शिधावाटप केंद्रातून धान्य घेत नसेल, तर ती अन्य ठिकाणावरून शिधा घेण्यास सक्षम आहे. त्यामुळे अशांची शिधापत्रिका रहित करून त्यांना मिळणारा लाभ अन्य लोकांना देता येईल.

मी राष्ट्रपती झाल्यानंतर काँग्रेसने राजकीय दिशा गमावली ! – प्रणव मुखर्जीं यांच्या पुस्तकात दावा

काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता हळूहळू बाहेर येत आहे. जो पक्ष स्वतःचे कार्यकते आणि नेते यांना दिशादर्शन देऊ शकला नाही, तो पक्ष जनतेला दिशादर्शन काय देणार ?

कृषी क्षेत्राच्या विकासाआड येणार्‍या सर्व भिंती पाडत आहोत ! – पंतप्रधान मोदी

कृषी क्षेत्राच्या विकासाच्या आड येणार्‍या सर्व भिंती आम्ही पाडत आहोत, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते एफ्.आय.सी.सी.आय.च्या ९३ व्या वार्षिक बैठकीचे ‘ऑनलाईन’ पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

कोरोनामुळे झालेल्या हानीच्या पार्श्‍वभूमीवर वृत्तपत्र उद्योगाकडून केंद्र सरकारकडे प्रोत्साहन पॅकेजची मागणी

८ मासांमध्ये या उद्योगाची सुमारे १२ सहस्र ५०० कोटी रुपयांची हानी झाली असून वर्षाच्या शेवटी ती १६ सहस्र कोटी रुपयांपर्यंत जाईल ! यामुळे केंद्र सरकारने वृत्तपत्र उद्योगाला प्रोत्साहन पॅकेज द्यावे – इंडियन न्यूजपेपर सोसायटी

गुजरातमध्ये कोरोनाच्या काळात २१ टक्के लोक कुपोषित ! – सर्वेक्षण

कोरोनाच्या आपत्काळात ही स्थिती आहे, तर पुढे येणार्‍या तिसर्‍या महायुद्धासारख्या आपत्काळात काय स्थिती असेल, याची कल्पना करता येईल ! अशा वेळी जिवंत रहाण्यासाठी जनतेला साधना करण्याला पर्याय नाही !