मुंबई – भाजपचे मुंबई उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांची श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयीचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने या न्यासावर नियुक्त केलेल्या कोषाध्यक्ष आणि इतर सदस्य यांचा कालावधी संपुष्टात आल्याने नव्या नियुक्त्या घोषित करण्यात आल्या. नव्या पदाधिकार्यांचा कालावधी अधिसूचना प्रसिद्ध केल्यापासून ३ वर्षांपर्यंत मर्यादित राहील.