नवी मुंबई – महानगरपालिकेच्या वतीने मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आल्याचा कालावधी संपून १० घंटे उलटले, तरी पाणी न मिळाल्याने नागरिकांचे हाल झाले.
अनेक इमारतीतील नागरिकांना सकाळी वापरण्यासाठीच्या पाण्यासाठी टँकर मागवावे लागले. पिण्याच्या आणि स्वयंपाकाच्या पाण्यासाठी बिसलेरी पाणी विकत घ्यावे लागले. काहींनी पावसाचे पाणी बादल्यांमध्ये साठवून त्याचा अन्य वापरासाठी उपयोग केला. सायंकाळनंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला.