भारताने भुतान आणि मालदीव यांना भेट स्वरूपात कोरोनावरील लसींचे अडीच लाख डोस पाठवले !

भारत नेहमीच शेजारी देशांना साहाय्य करत आला आहे; मात्र पाक आणि नेपाळ यांसारखे शेजारी देश भारताला पाण्यात पहात असतात. त्यांच्यासमवेत गांधीगिरी करण्याऐवजी त्यांना धडा शिकवण्याचाही प्रयत्न भारताने केला पाहिजे !

आमच्याही वर एखादे न्यायालय असते, तर ५० टक्के आदेश पालटले गेले असते ! – सर्वोच्च न्यायालय

‘जनतेच्या मनातील शंका दूर होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी निकाल देतांना असे जे म्हटले आहे, त्यावर न्यायव्यवस्थेने विचार करून ही त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत’, अशीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !

केंद्र सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी करणार !

नेताजी बोस यांची जयंती केवळ ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी न करता प्रत्यक्षात पराक्रम करून दाखवणे, हीच त्यांना खरी मानवंदना ठरील !

व्हॉट्सअ‍ॅपवरील माहिती चोरी होण्याची भीती असेल, तर ते भ्रमणभाषमधून काढून टाका ! – देहली उच्च न्यायालय

जर तुम्हाला वाटते की, व्हॉट्सअ‍ॅप तुमची माहिती सुरक्षित ठेवू शकणार नाही, तर तुम्ही ते तुमच्या भ्रमणभाष संचामधून काढून टाका, असा सल्ला देहली उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिला.

शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर मोर्च्याच्या अनुमतीविषयी पोलिसांनीच निर्णय घ्यावा  ! – सर्वोच्च न्यायालय

शेतकर्‍यांचा ट्रॅक्टर मोर्चा हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न असून पोलिसांनीच याविषयी निर्णय घ्यावा. केंद्र सरकारलाही परिस्थिती कशी हाताळावी ?, याचे पूर्ण अधिकार आहेत.

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी घाला !  

‘निधर्मी’ भारतात कुणीही ऊठसूठ हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती फोडतो, हिंदूंचे धर्मग्रंथ जाळतो, देवतांची टिंगळटवाळी करतो, वेब सिरीज, चित्रपट, नाटक, विज्ञापने यांच्या माध्यमांतून देवतांचे विडंबन करतो; पण बहुसंख्य हिंदूंना काही वाटत नाही, हे दुर्दैव !

कृषी कायद्याविषयी शेतकरी आणि सरकार यांच्याशी चर्चा करणार्‍या समितीमधील सदस्यांना वगळा !

‘परस्पर सामंजस्यातून काम करणार्‍या सदस्यांची निवड समितीत केली जावी. सध्या समितीचे सदस्य या कायद्यांचे समर्थन करणारे आहेत.

‘पीएम केअर फंड’चा हिशोब सार्वजनिक करा !  

१०० निवृत्त सनदी अधिकार्‍यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

आर्थिक अपव्यवहाराच्या प्रकरणी दोघा चिनी नागरिकांना अटक !

भारतातील चिनी नागरिकांवर सुरक्षायंत्रणांनी किती मोठ्या प्रमाणात लक्ष ठेवणे आवश्यक आहे, हे यातून दिसून येते ! त्यामुळे चिनी नागरिकांना भारतात प्रवेश द्यायचा का, याचा सरकारने विचार करावा !

धर्महानी रोखण्यासाठी अविरत कार्य करणारे पाक्षिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे समस्त हिंदुत्वनिष्ठांचा आधारस्तंभ ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

‘पाक्षिक सनातन प्रभात’च्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त १६ जानेवारी या दिवशी ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.