कोणत्याही अफवांना बळी पडू नका ! – पंतप्रधान मोदी

आपले शास्त्रज्ञ आणि तज्ञ यांना जेव्हा स्वदेशी लसीची सुरक्षितता अन् परिणामकारकता यांविषयी निश्‍चिती झाली, तेव्हाच त्यांनी या लसींच्या आपत्कालीन वापरास अनुमती दिली. त्यामुळे देशवासियांनी कोणत्याही भूलथापा, अफवा आणि अपप्रचार यांपासून सावध रहावे.

शेतकरी आंदोलनातील नेते बलदेव सिंह सिरसा यांची एन्.आय.ए.कडून चौकशी होणार

एन्.आय.ए.ने खलिस्तानी आतंकवादी संघटना आणि त्यांच्याकडून सामाजिक संघटनांना होणारा अर्थपुरवठा यांची सूची बनवली आहे. या सामाजिक संघटना विदेशातून मिळालेला पैसा देशविरोधी कारवायांसाठी व्यय (खर्च) करत असल्याची माहिती मिळाली आहे.  

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून सर्वप्रथम ५ लाख १०० रुपयांचे दान !

अयोध्येत उभारल्या जाणार्‍या श्रीराममंदिरासाठी निधी समर्पण अभियानाला १५ जानेवारीपासून प्रारंभ करण्यात आला. या कार्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून सर्वप्रथम ५ लाख १०० रुपयांचा निधी समर्पित करत या अभियानाला प्रारंभ करण्यात आला.

‘व्हॉट्सअ‍ॅप’ने माघार घेत अटी लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला !

‘व्हॉट्सअ‍ॅप’ने ४ जानेवारीला त्याच्या नव्या सेवा अटी (टर्म ऑफ सर्व्हिस) घोषित करत त्याची कार्यवाही ८ फेब्रुवारीपासून करण्यात येणार असल्याचे घोषित केले होतेे. या सेवा अटी न स्वीकारणार्‍याचे ‘व्हॉट्सअ‍ॅप’ डिलीट होणार आहे, असे यात म्हटले होते.

आमच्या धैर्याची कुणीही परीक्षा पाहू नये ! – सैन्यदलप्रमुख नरवणे यांची चीनला चेतावणी

भारतीय सैन्याच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आम्ही चर्चा आणि राजकीय वाटाघाटी यांमधून प्रश्‍न सोडवण्यासाठी कटीबद्ध आहोत; पण आमच्या धैर्याची कुणीही परीक्षा पाहू नये !

‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वरील वेब सिरीज ‘तांडव’मधून भगवान शिवाचा अवमान !

बहुसंख्येने हिंदू रहात असलेल्या देशात आणि केंद्रात भाजपचे सरकार असतांना अशा वेब सिरीज देशात चालू असणे, हिंदूंना अपेक्षित नाही ! काही धर्मप्रेमी वगळता इतर हिंदू हे मृतवत आहेत. त्यामुळेच हिंदु धर्मावर अशा प्रकारे आघात होतात !

आजपासून देशभरात कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्रारंभ

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी अनुमाने ३ लाख आरोग्य कर्मचार्‍यांना लस दिली जाईल. रुग्णालयांतील इतर वैद्यकीय सेवा बाधित होऊ नयेत, यासाठी जानेवारीत एकूण १० दिवसच लसीकरण होईल.

मकरसंक्रांतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली मान्यवर अधिवक्त्यांची भेट !

मकरसंक्रतीच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचे पू. अधिवक्ता हरिशंकर जैन, अधिवक्ता आर्. वेंकटरमणी आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांची समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सदिच्छा भेट घेतली.

जागतिक आरोग्य घटनेकडून पुन्हा भारताचे चुकीचे मानचित्र (नकाशा) प्रसारित

जागतिक आरोग्य संघटनेला शब्दांची भाषा समजत नसेल, तर भारताने तिला देण्यात येणारी वार्षिक देणगी बंद केली पाहिजे !

चीनची लस परिणामकारक नसल्याने ब्राझिलने भारताकडे मागितली कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस !

भारताकडे अनेक देशांनी भारत-निर्मित कोरोना लसींची मागणी केली आहे; मात्र सध्या लसींची निर्यात करण्यासंदर्भात कोणतेही धोरण ठरले नसल्याने भारताने ब्राझिलच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही.