केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे भाजप नेत्यांची मागणी
|
नवी देहली – अभिनेते सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अॅमेझॉन प्राईम’ या ‘ओटीटी’ अॅपवरून प्रदर्शित झालेल्या ‘तांडव’ या वेब सिरीजमधून भगवान शिव आणि श्रीराम यांचा अवमान करण्यात आल्याने तिच्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे भाजपचे नेते कपिल मिश्रा, नरेंद्रकुमार चावला, गौरव गोयल, खासदार योगी बालकनाथ, मुंबईतील खासदार मनोज कोटक यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी केली आहे. तसेच सामाजिक माध्यमांतून ‘#BanTandavNow’ आणि ‘#BoycottBollywood’ हे हॅशटॅगही ट्रेेंड करण्यात आले आहेत. यावर १ लाख ६५ सहस्र लोकांनी ट्वीट्स करून या वेब सिरीजचा विरोध केला. हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांच्याद्वारे निर्मित ‘तांडव’ ही वेब सिरीज ९ भागांची आहे. त्यात सैफ अली खान यांच्यासमवेत महंमद झिशान, अभिनेत्री डिंपल कपाडिया, अभिनेते सुनील ग्रोव्हर हे कलाकार आहेत.
Multiple reasons
👉Denigrates Gods Shiv & Ram
👉Shows Indians as Islamophobic
👉Ruling party asks police to kill 3 Muslim youth involved in farmer strike
👉Glorifies #TukdeTukdeGang
👉Scenes promote seditious activitiesPlz take cognizance @PrakashJavdekar ji pic.twitter.com/fi9j9trgtt
— Sanatan Prabhat (@sanatanprabhat) January 16, 2021
Hardline Anti-national agenda converted into web series whose sole motive is to shame Hinduism, promote communalism, racism & what not.
Negative portrayal of Hindus is not just a trend, it’s a nexus, aimed at demeaning Hindus at all costs & by all means!
A thread pic.twitter.com/GlpIp34Gr2
— Sanatan Prabhat (@sanatanprabhat) January 16, 2021
Agree Maximum Retweet
Shame on Bollywood. #BanTandavNow #BoycottBollywood pic.twitter.com/rwiAcUstuY
— 🇮🇳𝑴𝒖𝒌𝒆𝒔𝒉 💞❣️ 🕉️ᥬ 😎᭄हिम की चोटी ᥬ 😎᭄ (@LoveIndianNavy) January 17, 2021
‘तांडव’ वेब सिरीजवर बहिष्कार घाला ! – राम कदम, आमदार, भाजप
भाजपचे आमदार राम कदम यांनी जोपर्यंत या वेब सिरीजमध्ये योग्य ते पालट करण्यात येत नाहीत, तोपर्यंत ‘तांडव’ वेब सिरीजवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. आमदार राम कदम यांनी सामाजिक माध्यमांत ट्वीट करतांना म्हटले आहे की, चित्रपट किंवा वेब सिरीज यांच्या माध्यमातून कायम हिंदूंच्या देवतांचा अवमान का केला जातो ? अलीकडचे उदाहरण घ्यायचे झाले, तर नवीन वेब सिरीज ‘तांडव’ हे आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार्या वेब सिरीजचे सैफ अली खान पुन्हा एकदा भाग बनले आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी वेब सिरीजमधून ते दृश्य हटवले पाहिजे. अभिनेता झिशान अय्यूब याने जाहीरपणे क्षमा मागावी.
आखिरकार क्यों हर बार फिल्मों और वेब सीरीज में हिन्दू देवी देवताओं को अपमानित करने का काम किया जाता है। ताजा उदाहरण नई वेब सीरीज ‘तांडव’ है। सैफ अली खान एक बार फिर ऐसी फिल्म या सिरीज़ का हिस्सा है जो हिन्दू भावनाओं
को ठेस पहुचाता है। डायरेक्टर अली अब्बास जफर को सिरीज़ से भगवान pic.twitter.com/z35cHoiw9d— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) January 17, 2021
वेब सिरीजमधून सातत्याने हिंदुविरोधी गोष्टींचे प्रदर्शन ! – भाजपचे खासदार मनोज कोटक
केंद्रात भाजपचेच सरकार असल्याने कोटक यांनी सरकारला सांगून अशा वेब सिरीजवर बंदी घालण्यासह त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तात्काळ कायदा करण्याची मागणी केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
सौजन्य : TV9 Marathi
खासदार मनोज कोटक यांनी म्हटले आहे की, सातत्याने वेब सिरीजमधून हिंदूविरोधी गोष्टी दाखवण्यात येत आहेत. हिंदूंच्या देवतांची सतत थट्टा करण्यात येत आहे. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. यावर तात्काळ बंदी घालणे आवश्यक आहे.