|
नवी देहली – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) आर्थिक अपव्यवहाराच्या प्रकरणी चार्ली पेंग आणि कार्टर ली या नावांच्या दोघा चिनी नागरिकांना अटक केली आहे. हे दोघेही जण देहलीमध्ये राहून चिनी आस्थापनांसाठी हवालाचे मोठे रॅकेट चालवत होते आणि भारत सरकारला कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची हानी करत होते. गेल्या वर्षी आयकर विभागानेही चार्ली पेंग याच्या ठिकाणांवर धाडी घातल्या होत्या. चौकशीत हेही लक्षात आले लकी, चार्ली पेंगचा समावेश केवळ भारतातील हवाला कारभारात नव्हता, तर तो तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांची हेरगिरीही करत होता.
सौजन्य : इंडीया टुडे