भारताने भुतान आणि मालदीव यांना भेट स्वरूपात कोरोनावरील लसींचे अडीच लाख डोस पाठवले !

भारत नेहमीच शेजारी देशांना साहाय्य करत आला आहे; मात्र पाक आणि नेपाळ यांसारखे शेजारी देश भारताला पाण्यात पहात असतात. त्यांच्यासमवेत गांधीगिरी करण्याऐवजी त्यांना धडा शिकवण्याचाही प्रयत्न भारताने केला पाहिजे !

मालदीव येथे १ लाख कोराेना लसीचे डोस घेवून जाणारे एयर इंडियाचे विमान

नवी देहली – भारताने स्वदेशी कोरोना लसीचा पुरवठा शेजारील देश भुतान आणि मालदीव यांना भेट स्वरूपात पाठवला आहे. यापूर्वीच त्यांनी भारताकडे लसीची मागणी केली होती. भुतानला सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या ‘कोविशिल्ड’ लसीचे दीड लाख डोस पाठवण्यात आले आहेत. तसेच मालदीवची राजधानी माले येथेही मुंबईमधून ‘कोविशिल्ड’चे १ लाख डोस पाठवले गेले आहेत.

(सौजन्य : Mint)