शासकीय अहवालातून समोर आले वास्तव
मुंबई – डिस्ट्रिक्ट गुड गव्हर्नन्स इंडेक्स (जिल्हा सुशासन निर्देशांक) हा अहवाल राज्य सरकारने नुकताच घोषित केला. त्यात विविध १० क्षेत्रांतील संबंधित जिल्हा प्रशासनाच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले. प्रत्येक क्षेत्रातील कामगिरीला १०० गुण याप्रमाणे एकंदर १ सहस्रांपैकी जिल्ह्याने किती गुण मिळवले, यावर ३६ जिल्ह्यांच्या कामगिरीचे निर्देशांक निश्चित करण्यात आले आहेत. या निर्देशांकात नागपूर जिल्ह्याने ५३७ गुण घेत महाराष्ट्रात पहिली श्रेणी, तसेच अमरावतीने ५०९ गुणांसह चौथी श्रेणी पटकावली आहे; मात्र ज्या १० क्षेत्रांतील कामगिरीचा अहवालात आढावा घेण्यात आला, त्यांपैकी न्याय आणि लोकसुरक्षा (गुन्हेगारी), तसेच सामाजिक विकास या दोन क्षेत्रांत सर्वच जिल्हे मागे आहेत. या अहवालानुसार राज्यातील ३६ पैकी तब्बल ३२ जिल्हे गुन्हेगारी रोखण्यात अनुत्तीर्ण झाले आहेत.
Maharashtra’s 32 Districts Fail to Curb Crime!
Reality Revealed Through Government Report
The situation is dire. It is expected that the police administration across all districts will make rigorous efforts to curb crime! pic.twitter.com/0VirJgCQid
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 14, 2025
संपादकीय भूमिकाही स्थिती दयनीय आहे. सर्वच जिल्ह्यांतील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर प्रयत्न करणे अपेक्षित आहेत ! |