‘देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था ।
महापराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था ॥’,
असे ज्या छत्रपती संभाजी महाराज यांचे वर्णन केले जाते त्यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. हा चित्रपट पूर्णत: जरी हिंदुत्वाकडे झुकलेला किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील जरी काहीच गोष्टी दाखवत असला, तरी ‘धर्मासाठी बलीदान कसे असावे’, हे आजच्या युवकांसमोर आदर्श निर्माण करणारा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदर काही वाद निर्माण झाले होते; मात्र दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी चित्रपटात चुकीचा इतिहास मांडलेला नाही उलट एका महान राजाचे चरित्र लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे !
भव्य लढाया आणि चांगले सेटस !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाण्यानंतर मोगल आणि औरंगजेब यांना नामोहरम करण्याचे काम कुणी केले असेल, तर ते छत्रपती संभाजी महाराज यांनी ! त्यांची महानता, शौर्य, धर्माभिमान, धीरोदात्तता हे सर्व या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट हिंदी भाषेत बनवल्याने छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र आणि मराठ्यांचा इतिहास देशाच्या कानाकोपर्यापर्यंत पोचण्यास साहाय्य झाले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज ज्या ज्या लढाया लढले, त्या चांगल्या प्रकारे चित्रित केलेल्या आहेत. या लढायांच्या माध्यमातून मराठ्यांनी गनिमी कावा वापरून मोगलांना कशा प्रकारे नामोहरम केले जात होते, ते अतिशय चांगल्या प्रकारे दाखवले आहे. औरंगजेबाचे सैन्य दख्खनमध्ये आल्यावर अल्प संख्येने असलेले मराठे औरंगजेबाच्या सैन्याला कशी मात देतात, हे अतिशय चांगल्या प्रकारे चित्रित करण्यात आले आहे.
An iconic movie depicting the life of Chatrapati Sambhaji Maharaj – #Chhaava 🎬👑
Snippets of public reviews on the first day of its release:
“Every Indian should watch the movie #Chhava to know about the life of Sambhaji Maharaj and his contribution to society” 🇮🇳
“I am… pic.twitter.com/UozX0gOAvJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 14, 2025
Chhaava | Official Trailer | Vicky K | Rashmika M | Akshaye K | Dinesh Vijan | Laxman U | 14th Feb
(सौजन्य : Maddock Films) |
अभिनेते विकी कौशल यांचा अभिनय !
या चित्रपटामध्ये अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका अक्षरश: भूमिका जगलेले आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी चांगल्या प्रकारे परिश्रम घेतले आहेत. ही भूमिका करण्यासाठी त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला. ज्या वेळी विकी कौशल शेवटच्या लढाईपूर्वी ‘नम: पार्वती पते हर हर महादेव’ म्हणतात, त्या वेळी अक्षरश: अंगावर शहारे उभे रहातात. शेवटच्या मोगलांसमवेतच्या लढाईत तर विकी कौशल यांनी अक्षरश: जीव ओतलेला आहे. या लढाईच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांची शारीरिक शक्तीही समोर येते.

शेवटची १५ मिनिटे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानावर !
‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी जगावे कसे, हे शिकवते, तर छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन धर्मासाठी बलीदान कसे असावे’, यांसाठी आहे. हाच भाग शेवटच्या १५ मिनिटांत अतिशय ठळकपणे मांडण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने कैद केल्यापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत जे काही चित्रपटात दाखवता येणे शक्य आहे ते दाखवलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची नखे उचकटून काढणे, त्यांचे डोळे फोडणे, रक्ताळलेल्या शरिरावर ‘मीठ’ टाकणे आणि त्यांची जीभ खेचून काढणे, हे प्रसंग पाहून चित्रपट पहाणारे अक्षरश: स्तब्ध होतात आणि ज्याचे डोळे पाणावले नाहीत, असा एकही प्रेक्षक चित्रपटगृहात नसतो. औरंगजेब छत्रपती संभाजी महाराज यांचे डोळे काढल्यावर त्यांना ‘धर्म परिवर्तन करण्याचे आवाहन करतो’, तेव्हा छत्रपती संभाजी महाराज त्याला हिंदु धर्माचे महत्त्व सांगतात ते दृश्य अतिशय चांगल्या प्रकारे चित्रित केलेले आहे.
अन्य कलाकारांचा अभिनय !
या चित्रपटात विकी कौशल यांच्या तोडीस तोड कुणी अभिनय केला असेल, तर अक्षय खन्ना यांनी साकारलेला ‘औरंगजेब’ होय ! अतिशय क्रूर असलेला औरंगजेब शेवटी छत्रपती संभाजी महाराज यांना ठार केल्यावरही जेव्हा ‘छत्रपती राजाराम महाराज हे स्वराज्याचे छत्रपती झालेले ऐकतो’, तेव्हा तो अतिशय हताश होऊन भूमीवर कोसळतो. हे दृश्य अतिशय सुंदर पद्धतीने वठण्यात आलेले आहे. अभिनेते आशुतोष राणा, संतोष जुवेकर यांनी साकारलेल्या मावळ्यांच्या भूमिकाही चांगल्या असून छत्रपती संभाजी महाराज यांची पत्नी येसूबाईची भूमिका दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने साकारली असून तिनेही एका छत्रपतीच्या पत्नीची विचारसरणी कशी असावी, ती स्वराज्याचा विचार कशा प्रकारे करू शकते, हे अतिशय चांगल्या प्रकारे दाखवले आहे.
#Chhaava Review : A Compelling Movie that powerfully depicts the greatest sacrifice for Dharma!
|
एकूणच पैसा आणि केवळ स्वत:चे ‘करियर’ यांसाठी धडपडणार्या तरुण पिढीला ‘स्वराज्य’ आणि ‘स्वधर्मनिष्ठा’ शिकवणारा हा छावा सहकुटुंब अवश्य पहाण्यासारखा आहे !
– श्री. अजय केळकर, कोल्हापूर (१४.२.२०२५)
हे ही वाचा → हिरव्या ‘बॉलीवूड’करांना भगवे प्रत्युत्तर : ‘छावा’ ! |