JNU Report On Delhi Muslim Population : देहलीत बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांमुळे मुसलमानांच्या लोकसंख्येत वाढ

  • जवाहरलाल नेहरू विद्यापिठाचा (जे.एन्.यू.चा) अहवाल

  • घुसखोरांमुळे अर्थ, आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था यांवर होत आहे परिणाम !

नवी देहली – बांगलादेश आणि म्यानमार येथून आलेल्या घुसखोरांमुळे देहलीत मुसलमानांच्या लोकसंख्येमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था डबघाईला येत आहे. सुविधांवरही दबाव वाढला आहे. आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. कालपर्यंत हरियाणा, पूर्वांचल (उत्तरप्रदेश), ओडिशा आणि केरळ या राज्यांतील कामगार वर्गाची जागा आता रोहिंग्या मुसलमानांनी घेतली आहे. त्यांनी बेकायदेशीरपणे कामगारांकडून काम हिसकावून घेतले आहे, अशी माहिती जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जे.एन्.यू.च्या) अहवालात देण्यात आली आहे.

‘देहलीतील बेकायदेशीर स्थलांतर : सामाजिक-आर्थिक आणि राजकीय परिणामांचे विश्‍लेषण’ असे या अहवालाचे शीर्षक आहे.

१. अहवालात असेही म्हटले आहे की, हे बांगलादेशी आणि रोहिंग्या देहलीतील जामियानगर, झाकीरनगर (ओखला), लाजपतनगर, सीलमपूर, सुलतानपुरी, मुस्तफाबाद, निजामुद्दीन, सराय रोहिल्ला, शाहदरा, भालस्वा डेअरी, बवाना, द्वारका, रोहिणी, मोतीनगर, कैलाशनगर, खिचडीपूर, सराय काले खान, जाफ्राबाद, खान मार्केट आणि गोविंदपुरी येथे रहातात.

२. अहवाल म्हटले आहे की, बांगलादेशातून अवैध स्थलांतराचा इतिहास वर्ष २०१७ च्या रोहिंग्या संकटाशी जोडलेला आहे, ज्या काळात लाखो निर्वासित भारतात पळून गेले. यांतील अनेक देहलीत स्थायिक झाले. या बेकायदेशीर स्थलांतरित लोकांना येथे घरे आणि नोकर्‍या मिळण्यासाठी दलाल अन् धार्मिक नेते साहाय्य करतात. त्यांचे जाळे घुसखोरांना कागदपत्रे बनवून देते. ज्यामुळे देशाची कायदेशीर व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रिया कमकुवत होत आहे.

३. या लोकांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे गुन्हेगारीही वाढली आहे. देहली पोलीस ११ डिसेंबर २०२४ पासून बांगलादेशींची ओळख पटवण्यासाठी मोहीम राबवत आहेत.

४. अहवालानुसार बेकायदेशीर स्थलांतरितांनी बांधलेल्या अनधिकृत वसाहतींमुळे झोपडपट्ट्या आणि अनियोजित वसाहती वाढल्या आहेत, ज्यामुळे देहलीच्या आधीच तणावाखाली असलेल्या पायाभूत सुविधांवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. यामध्ये गृहनिर्माण, स्वच्छता आणि पाणीपुरवठा यांचा समावेश आहे.

५. या स्थलांतरितांमुळे देहलीतील आरोग्य व्यवस्थेलाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ज्या भागात बेकायदेशीर बांगलादेशी राहत आहेत, त्या भागात शिक्षण व्यवस्थेवर मोठा ताण आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. या समस्येमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम झाला आहे.

संपादकीय भूमिका

  • देहलीच नाही, तर संपूर्ण देशात ही स्थिती होत आहे. जर आताच काही केले नाही, तर भारताचा उद्या पाकिस्तान आणि बांगलादेश झाल्याखेरीज रहाणार नाही.
  • भारताला वर्ष २०४७ पर्यंत इस्लामी देश बनवण्याचे धर्मांध मुसलमानांचे षड्यंत्र याच आधारे पूर्ण केले जाणार आहे, हे लक्षात घेऊन भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा !