औरंगजेबाची स्तुती केल्यामुळे आमदार अबू आझमी यांच्या विरोधात शिवसेनेचे पुणे येथे आंदोलन !
समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करून त्याची स्तुती केली. या पार्श्वभूमीवर पुणे शहर शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली अबू आझमी विरोधात स्वारगेट येथे निषेध आंदोलन करण्यात आले.