CM Yogi Adityanath : समाजवादी पक्षाचे नेते त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये शिकवतात; पण लोकांच्या मुलांनी उर्दू शिकावे, असे त्यांना वाटते !

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत उर्दूप्रेमी समाजवादी पक्षाची काढली खरडपट्टी !

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – समाजवादी पक्षाचे नेते त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकवतात; पण त्यांना तुमच्या मुलांनी उर्दू शिकावे असे वाटते. हे लोक त्या मुलांना मौलवी बनवू इच्छितात. समाजवादी पक्षाचे नेते देशाला कट्टरतावादाकडे घेऊन जाऊ इच्छितात का ? हे चालणार नाही. समाजवाद्यांचे दुहेरी चरित्र जनतेसमोर उघड केले पाहिजे, अशा शब्दांत उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत समाजवादी पक्षाला फटकारले. समाजवादी पक्षाने विधानसभेचे कामकाज इंग्रजीपेक्षा उर्दू भाषेत चालवण्याची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीका केली.


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, विरोधी पक्ष प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करतो. हेच लोक उर्दूचा पुरस्कार करतात. ते भोजपुरी, अवधी या भाषांना विरोध करतात. आम्ही स्थानिक भाषांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहोत. उत्तरप्रदेशातील बोलीभाषांचा आदर केला पाहिजे. त्यांच्या संरक्षणासाठी, आमचे सरकार भोजपुरी अकादमीची स्थापना करत आहे. संत तुलसीदासजींच्या नावाने अवधी अकादमीची स्थापना केली जात आहे. ब्रजभाषा अकादमीची स्थापना केली जात आहे. सूरदासांनी त्यांचे सर्व ग्रंथ ब्रज भाषेत लिहिले आहेत. रामचरितमानस उत्तर भारतातील लोकांसाठी आणि मॉरिशस आणि फिजीसह इतर देशांमध्ये रहाणार्‍या स्थलांतरितांसाठी एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. तो अवधी भाषेत आहे.

संपादकीय भूमिका

उर्दू विदेशी भाषा आहे आणि त्याचा देशात आणि विदेशांत कोणताही लाभ नाही. त्याचा पुरस्कार करणार्‍या पक्षातील नेत्यांना इस्लामी देशांत पाठवून दिले पाहिजे !