सत्ताधार्‍यांच्या चहापानाचेही राजकारण !

चहापानाचा कार्यक्रम हा काही विधीमंडळाच्या कामकाजाचा अधिकृत भाग नाही; मात्र ‘सत्ताधार्‍यांनी विरोधकांना चहापानाला बोलावणे आणि विरोधकांनी त्यावर बहिष्कार घालणे’, हा जणू पायंडा पडला आहे.

विधीमंडळाचे कामकाज करतांना ‘जनतेचे प्रतिनिधी आहोत’, अशी जाणीव हवी !

सहस्रावधी प्रश्‍न प्रलंबित असतांना खरे तर शाळेतील गृहपाठाप्रमाणे नियमितचे कामकाज त्‍याच दिवशी पूर्ण करायचा दंडक लागू करणे आवश्‍यक आहे.

तोडगा काढण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि शरद पवार यांची चर्चा !

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांची भेट घेऊन गेल्या वर्षी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्याच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांचा विधानभवनाच्या परिसरात पूर्णाकृती पुतळा उभारण्याची विधान परिषदेतील सर्वपक्षीय आमदारांची मागणी !

दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या कार्याचे स्मरण भावी पिढीला व्हावे, यासाठी विधानभवनाच्या परिसरात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी विधान परिषदेतील सर्वपक्षीय आमदारांकडून करण्यात आली आहे.

३ ऑगस्ट या दिवशी विधीमंडळ सदस्यांसाठी होणार ध्यानयोग शिबिर !

विधीमंडळातील सदस्यांकरिता ३ ऑगस्ट या दिवशी सकाळी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ‘समर्पण ध्यानयोग’ या एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात आणीबाणी लावत आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

फडणवीस म्हणाले , महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला देशाची कोरोनाची राजधानी करून टाकली आहे.

राज्यातील वीजतोडणी थांबवण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

राज्यातील वाढीव वीज देयकांविषयी जोपर्यंत सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही, तोपर्यंत घरगुती आणि शेतकरी यांची वीजजोडणी तोडण्यात येणार नाही, अशी ग्वाही देऊन वीजतोडणी थांबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ मार्च या दिवशी विधानसभेत दिले.

भाजप आमदारांकडून आर्णी नगरपालिकेत अपहार करणार्‍या बांधकाम अभियंत्याला निलंबित करण्यासाठी गोंधळ !

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नगरपालिकेतील बांधकाम अभियंता आणि कंत्राटदार यांनी संगनमत करून मान्सूनपूर्व कामात लाखो रुपयांचा अपहार केला असल्याने बांधकाम अभियंता नीलेश राठोड यांना निलंबित करण्यात यावे, अशी आग्रहाची मागणी आर्णी येथील आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी विधानसभेत २ मार्च या दिवशी प्रश्‍नोत्तरात केली.

कामकाज अधिक असले, तरी मंत्र्यांनी लक्षवेधीला उपस्थित रहावे ! – सभापती, विधान परिषद

जनतेचे प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वसन देेणार्‍या लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्षात त्यासाठी वेळ देणे अपेक्षित आहे !

राज्यातील ९० टक्के वाळू उत्खनन अवैध, जिल्हाधिकार्‍यांपासून मंत्रालयापर्यंत हप्ते चालू ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

गेली अनेक वर्षे अवैध वाळूउपसा होत आहे. यात अनेक वेळा तहसीलदार, माहिती अधिकार कार्यकर्ते आदींवर प्राणघातक आक्रमणे झाली आहेत. अवैध वाळूउपसा चालू रहाण्यामागे भ्रष्टाचार हेच मोठे कारण आहे, हे सामान्य जनतेलाही माहीत आहे.