
मुंबई, ४ मार्च (वार्ता.) : क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या विरोधात ४ मार्च या दिवशी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाणे येथील श्री. किरण नाकती यांनी आझमी यांच्या विरोधात तक्रार केली होती.
गुन्हा नोंदवल्याची प्रत (Copy of the FIR)
|
‘औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या काळात भारताची ओळख ‘सोने की चिडियाँ’, अशी होती’, अशा शब्दांत अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण केले होते. धर्मवीर संभाजी महाराजांवर ४० दिवस क्रौर्यतेने अत्याचार करून त्यांची हत्या करणार्या, हिंदु महिलांवर अत्याचार करणार्या, हिंदूंचे धर्मांतर करणार्या आणि मंदिरे पाडणार्या औरंगजेबाचे उदात्तीकरण म्हणजे हिंदूंच्या भावनांचा अवमान आहे, असे श्री. नाकती यांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे.