‘महाकुंभ नाही, तर मृत्यूकुंभच !’ – अखिलेश यादव यांच्याकडून ममता बॅनर्जी यांच्या विधानाचे समर्थन

अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाकुंभाला ‘मृत्यूकुंभ’ म्हटले होते. त्यांच्या विधानाचे समाजवादी पक्षाचे प्रमुख असणारे खासदार अखिलेश यादव यांनी समर्थन केले. ते म्हणाले की, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी योग्य तेच सांगितले. त्यांच्या राज्यातील लोकांनीही प्राण गमावले आहेत. बंगाल आणि इतर राज्यांमधील मोठ्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडले आहेत. व्यवस्था करण्याचे दायित्व कुणाचे होते ? भाजप जनतेच्या भावनांचा अपलाभ घेत आहे. या कुंभात सर्वाधिक बेपत्ता प्रकरणे समोर आली, या कुंभात सर्वाधिक मृत्यू झाले, या कुंभात सर्वाधिक लोक आजारी पडले. (मागील कुंभाच्या वेळी अखिलेश सिंह मुख्यमंत्री असतांनाही चेंगराचेंगरी होऊन अनेक जणांचा मृत्यू झाला होता, त्या विषयी ते का बोलत नाहीत ? – संपादक)

संपादकीय भूमिका

कारसेवकांना गोळ्या घालून त्यांच्या प्रेतांना दगड बांधून ती शरयू नदीत फेकणार्‍या मुलायमसिंह यादव यांच्या मुलाकडून अशा प्रकारचे विधान करणे विनोदच म्हणावा लागले !