उत्तरप्रदेशमध्ये नियमांचे उल्लंघन करून बढती मिळवणार्‍या ४ अधिकार्‍यांची थेट चौकीदार, कारकून आदी पदांवर नियुक्ती !

अशांची पदावनती न करता त्यांना थेट बडफर्तच केले पाहिजे; कारण अशा मानसिकतेच्या व्यक्ती खालच्या पदावर नियुक्त झाल्या, तरी पुन्हा भ्रष्टाचार करणार नाहीत, याची शाश्‍वती देता येणार नाही !

राजकीय ‘लस’ !

जनहिताऐवजी स्वहिताकडे लक्ष देणारे असे राजकारणी भारताच्या भवितव्यासाठी घातक आहेत. सतत स्वहिताचाच विचार करणारे असे राजकारणी समाजाचा उत्कर्ष करू शकत नाहीत. त्यामुळे अशांना घरी बसवण्यासाठी आता जनतेनेच पावले उचलणे आवश्यक !

‘कोविशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या लसींना तातडीच्या वापरासाठी संमती

केंद्र सरकारने ‘सीरम’ आणि ‘ऑक्सफोर्ड’ने बनवलेली ‘कोविशिल्ड’, तसेच ‘भारत बायोटेक’ आस्थापनाने बनवलेली ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी संमती दिली आहे.

समाजवादी पक्षाचे माजी खाणमंत्री गायत्री प्रजापती यांचे घर आणि कार्यालये यांवर ईडीच्या धाडी

एवढी अवैध संपत्ती जमा करेपर्यंत अन्वेषण यंत्रणा झोपल्या होत्या का ? कि त्यांना त्या वेळी कारवाई न करण्यासाठी लाच देण्यात आली होती ? देशातील अन्य भ्रष्ट आजी-माजी मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे किती अवैध संपत्ती असेल, कोण जाणे !

समाजवादी दिखाऊपणा !

प्रत्येक वेळी हिंदूंच्या देवतांची नावे घेऊन आणि ‘भक्त’पणाचा आव आणून सत्ताकारण करता येत नाही, हे अखिलेश यादव यांनी लक्षात घेऊन श्रीरामाप्रमाणे आदर्श ‘रामराज्य’ आणण्यासाठी अन् श्रीकृष्णाप्रमाणे आदर्श राष्ट्रकारण करण्यासाठी प्रयत्नशील रहावे !

(म्हणे) ‘भगवान श्रीराम हे समाजवादी पक्षाचेही असून आम्हीसुद्धा रामभक्त आहोत !’ – समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव

यादव कुटुंब रामभक्त असते, तर अखिलेश यादव यांचे वडील मुलायमसिंह यादव यांनी मुख्यमंत्रीपदावर असतांना कारसेवकांना गोळ्या घालून त्यांचे मृतदेह दगड बांधून शरयू नदीत बुडवण्याचा आदेश दिला नसता !

समाजवादी पक्षाची ढोंगी रामभक्ती जाणा ! 

भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावर कुणाचाही अधिकार नाही. भगवान श्रीराम हे समाजवादी पक्षाचेही आहेत. आम्ही रामभक्त आणि कृष्णभक्त आहोत, असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले.

(म्हणे) ‘छळापासून वाचायचे असेल, तर हिंदु तरुणींना बहीण मानावे !’  

धर्मांधांच्या विरोधात कायदा म्हणजे ‘छळ’ असे समजणारे धर्मांध नेते ! धर्मांधांच्या विरोधात कायदा केला, तर त्यांच्यावर वचक बसवता येऊ शकतो, हेच यातून लक्षात येते. तरीही यावर समाधानी न रहाता हिंदूंनी सतर्क राहून हिंदु तरुणींचे रक्षण केले पाहिजे !

वासनांध धर्मांधांचे ढोंग जाणा !

‘लव्ह जिहाद’ एक राजकीय स्टंट आहे. मी मुसलमान तरुणांना आवाहन करतो की, छळापासून वाचायचे असेल, तर त्यांनी हिंदु तरुणींना बहीण मानावे, असे विधान समाजवादी पक्षाचे नेते एस्.टी. हसन यांनी लव्ह जिहादविरोधी कायद्यापासून वाचण्यासाठी केले.