औरंगजेबाची स्तुती केल्यामुळे आमदार अबू आझमी यांच्या विरोधात शिवसेनेचे पुणे येथे आंदोलन !

देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून आमदारकीचे त्यागपत्र घेण्याची मागणी

पुणे – समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करून त्याची स्तुती केली. या पार्श्वभूमीवर पुणे शहर शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली अबू आझमी विरोधात स्वारगेट येथे निषेध आंदोलन करण्यात आले. अबू आझमी यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांच्या आमदारकीचे त्यागपत्र घ्यावे, अशी मागणी शिवसैनिकांनी केली. (अशी मागणी करण्याची वेळ येणे दुर्दैवी ! – संपादक)

भानगिरे म्हणाले, ‘‘औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याची स्तुती करणे, म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान आहे. अबू आझमी ही महाराष्ट्राच्या राजकारणातील घाण आहे. औरंग्याचे उदात्तीकरण करणार्‍यांचा यापुढे चौरंगा केला जाईल आणि अशा अवलादी जागेवरच ठेचून काढल्या जातील.’’