५ मासांत ७ बालविवाह थांबवण्यात जिल्हा प्रशासनाला यश !
नागपूर – इयत्ता १० वीत शिकणार्या अल्पवयीन मुलीचा ३० वर्षीय तरुणासमवेत होणारा विवाह महिला आणि बालविकास विभागाच्या पथकाने धंतोली पोलिसांच्या साहाय्याने रोखला. अचानक जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि चाईल्ड लाईन संस्थेच्या सदस्यांसह पोलीस घरी पोचले. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी मुलीला कह्यात घेतले, तर तिच्या आई-वडिलांचे समुपदेशन करून विवाह सोहळा थांबवण्यात आला. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाला गेल्या ५ मासांत ७ बालविवाह रोखण्यात यश आले आहे.